माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालयासह
शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शिबिरात नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी शिबिरास उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मंजुळ असे मार्गदर्शन केले आहे
राज्यातील आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत सदरच्या विशेष शिबिरांचे आयोजन दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी तहसिल कार्यालय नायगांव त्याच बरोबर व शरदचंद्र पवार महाविद्यालय नायगांव बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात करण्यात आले त्यावेळी त्या मार्गदर्शन करत होत्या तालुक्यातील एच टू एच घरोघरी सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने युवा मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
यावेळी नायगावच्या तहसिलदार मंजुषाताई भगत मॅडम प्राचार्य डॉ.के.हरीबाबु निवडणुक नायब तहसीलदार विजय येरावाड पेशकार रोशनसिंघ ग्रंथी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गोविंद परडे डाटा एंन्ट्री ऑपरेटर साईनाथ भंडारे आदी कर्मचारी उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी उत्फूर्तपणे या शिबीरास प्रतिसाद देऊन २१ फॉर्म ऑनलाईन तसेच डॉक्युमेंट जमा न केल्यामुळे २७ फॉर्म ऑफलाईन भरुन प्रस्तुत कार्यालयास सुपूर्त केले अशी माहिती नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी दिली आहे

0 Comments