विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
कृषी महाविद्यालय नायगांव येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम रावे अंतर्गत धानोरा त. मा.येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे
दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्याला ७६ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने देशभर अमृतमहोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून वसंत रोपवाटिका कृषी महाविद्यालय नायगांव च्या वतीने विविध प्रकारच्या झाडांची रोपे विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वतीने गावामध्ये वृक्षदिंडी, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सौ. गंगुताई संजय पा. कंदुरके, उपसरपंच सौ. चंद्रकलाबाई व्यंकटराव गजले, चेअरमन : यशवंतराव पा. कुन्हाडे, पंचायत समिती सदस्यः परमेश्वर गुरुजी (माजी सरपंच), आनंदराव गुरुजी धानोरकर व ग्रामस्थ व जी.प . प्राथमिक शाळा धानोरा (त. मा.) मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थी विजय वडजे, शशांक तनमोर, अभिषेक सरवदे, ऋषिकेश तलवारे, विनय हंगरकर, ओमकार तांबुलवाड, शिंदे आदित्य, थोटे सचिन, डोपेवाड पुनीत, तिरूनागरी संजय, सूर्या सामला, शुभम वाघमारे, शुभम तायनाथ, शिवणकर विनायक या सर्व कृषी दुतांनी अथक परिश्रम घेतले.
तसेच सदरील कार्यक्रम एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्रा. रवींद्र चव्हाण, संचालक श्री रमेश लव्हेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश नादरे, रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर, रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. तोटेवाड, विषय तज्ञ प्रा. संभाजी तळणे व पोमदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या पार पाडला.

0 Comments