Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या होटाळा येथे बॅनर फाडल्याच्या कारणा वरून ठाण्यात तीन जणावर ॲट्रॉसिटी दाखल -

        माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या होटाळा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याचे बॅनर पाडल्याच्या कारणावरून येथील सुवर्णाच्या तीन जनावर नायगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाचावार व ठाणे अंमलदार हिमगिरे यांनी दिली आहेतालुक्यातील होटाळा येथील घटना ही दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी घडली असली तरी दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली यांनी होटाळा येथील सुवर्णाच्या तीन जनावर ॲट्रॉसिटी नायगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे

पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या होटाळा येथील रहिवासी असलेले रमेश शिवाजी कोतेवार यांच्या फिर्यादी वरून याच गावातील तिघावर म्हणजे यातील आरोपी ओमकार दत्तात्रय पवार दिनेश दत्तात्रय उमरेकर सुरेश दसरथ पवार यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत  ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण जनार्दन हनपुडे पाटील यांनी ॲट्रॉसिटी प्रकरणाचा पुढील तपास जारी केला आहे 

Post a Comment

0 Comments