Header Ads Widget

दलित वस्ती रुई बु येथे सिंगल फेजचे ट्रान्सफार्मर दोन दिवसात उपलब्ध करून देण्याचे विद्युत वितरणच्या अभियंत्याचे गजानन पाटील शिंदे यांना आश्वासन

 


        माधव पवार

नायगाव तालुक्यातील रुई बु येथील दलित वस्ती मधील डीपीचा सिंगल ट्रान्सफार्मरचा स्फोट होऊन सदरची दलित वस्ती अंधारात असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीचे नायगाव येथील उप अभियंता अनिल कुमार तिवारी यांना प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांनी भेट घेऊन दलित वस्तीसाठी सिंगल फेजच्या ट्रांसफार्मरची मागणी केली असता दोन दिवसात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपअभियंता अनिल कुमार तिवारी यांनी दिली आहे

तालुक्यातील रुई बु येथील दलित वस्तीच्या संदर्भामध्ये सिंगल फेजच्या ट्रांसफार्मर बाबत व विविध समस्याच्या बाबतीमध्ये प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांच्यात चर्चा होऊन अगदी दोन दिवसात दलित वस्तीचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सिंगल फेज ट्रांसफार्मर उपलब्ध करून देण्याससाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्युत वितरणचे उपअभियंता अनिल कुमार तिवारी यांनी गजानन शिंदे यांना सांगितले आहे

ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करीत असताना सहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून विद्युत पुरवठा स्टॅन्ड करावा लागतो त्याच बरोबर गावांतर्गत असलेले नागरिक घरगुती मीटर घेण्यास तयार नसतात आणि फुकट छाप आकोडे टाकून लाईट घेऊन अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लाईटच्या बाबतीत संपर्क करून विचारत असतात परंतु प्रत्यक्षात गाव कोणते ही असो त्या गावांमध्ये घरगुती मीटरचे प्रमाण अतिशय कमी असून आकोडे बहादराची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात असल्याचे ही उप अभियंत्याने गजानन पाटील शिंदे यांना सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments