Header Ads Widget

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा लावण्याचे नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांचे सरपंच व ग्राम सेवकांना आवाहन !!

        माधव पवार
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमा निमित्त नायगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये सरपंच व ग्रामसेवकानी हर घर तिरंगा लावण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाऊन अलाउन्समेंट करून नागरिकांना सूचना द्यावेत असे नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी सर्व सरपंच व ग्रामसेवकांना नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून आवाहन केल्या आहेत
केंद्र शासनाच्या सूचना नुसार हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सदरचा उपक्रम राबविण्यात यावा सदर उपक्रम उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय/ निमशासकीय कार्यालये सर्व महाविद्यालये वसतिगृहे निवासस्थाने इत्यादी इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविला पाहिजे असे सांगण्यात येत आहे देशाचा अमृत महोत्सव हा येत्या स्वतंत्र दिनी होत असल्यामुळे तालुक्यातील ८९ गावाच्या सरपंच व उपसरपंचाने त्याच बरोबर ग्रामसेवक  यांनी गावातील नागरिकांना घर घर तिरंगा लावण्यासाठी दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी पासून लावण्यासाठी सूचना कराव्यात अशा नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी महत्त्वाचे आवाहन केले असून या सूचनेचे सर्वांनी पालन करावे असे ही तहसीलदार भगत यांनी सांगितले आहे

तिरंगा -  ध्वज नेहमी आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आपण सदैव आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे म्हणून देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा लावला पाहिजे असे हे नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी महत्वाची सूचना ग्रामसेवक व सरपंच उपसरपंच यांना केल्या आहेत 




Post a Comment

0 Comments