माधव पवार
राज्यातील आयडिया कंपनी असो कि जिओ कंपनी असो मोबाईल धारका कडून अगोदर रिचार्ज करून घेऊन नंतर सेवा देत असते परंतु महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही ग्राहकांना अगोदर सेवा देते नंतर बिल वसुली करत बसते तरी पण ग्राहक मात्र बिले भरण्यासाठी टाळाटाळ करीत असतात ग्रहकानी टाईम टू टाईम बिले भरत नसल्यामुळे विद्युत वितरण कंपनी घाट्यात आल्याचे सांगण्यात येत आहे
ग्रामीण भागात गावांतर्गतचे ट्रान्सफार्मर जळाल्याच्या नंतर तात्काळ बसविण्यात यावे म्हणून ग्राहकांचा व गावातील सरपंचाचा व ग्रामसेवकाचा रेटा असतो असे असताना ही विद्युत वितरण कंपनी लाईन स्टॅन्ड करण्यासाठी कर्मचाऱ्यां कडून प्रयत्न करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्या कडून संबंधित कर्मचाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की घरगुती मीटर धारकांना मोबाईल रिचार्जचे उदाहरण देऊन थकीत बिले वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना करण्यात आल्याच्या समजते
शेतकरी असो की घरगुती मीटर धारक असो यांनी आयडिया कंपनीचे रिचार्ज असो की जिओ कंपनीचे रिचार्ज असो अथवा एअरटेलचे रिचार्ज असो की वोडाफोनचे रिचार्ज असो रिचार्ज संपण्याच्या अगोदरच रिचार्ज करून घेत आहेत
विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक थकीत बिल का भरत नाहीत असा ग्राहकांना दोन्ही मधला फरक समजावून सांगून थकीत बिले वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे बिले वसूल करावे अशा सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments