येथील रहिवाशी व सध्या उदगीर येथे पत्रकारिता क्षेत्रांत कार्यरत असलेले शंकर बोईनवाड यांना नुकताच मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने " तानूबाई बिर्जे आदर्श पत्रकारिता पुरस्कार " प्रदान करण्यात आला.
राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.संजयजी बनसोडे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी मराठा सेवा संघाचे प्रा.विवेक सुकने, माधवराव हलगरे, तालुकाध्यक्ष प्रदिप ढगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
श्री.शंकर बोईनवाड हे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण साहित्य,व सामाजिक क्षेत्रांत पत्रकारीतेच्या माध्यमातून उत्कृष्ट असे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे
त्याना यापूर्वी साहित्य आणि पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0 Comments