Header Ads Widget

कृषी कन्या कडून शेळगाव छत्री येथे लंपी रोगाचे लसीकरण संपन्न - विजय वडजे यांची माहिती !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे कृषी कन्या महाविद्यालयाच्या मार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक संलग्नक अंतर्गत लंपी  रोगावर लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे 
यावेळी लंपी रोगावर लसीकरण जंतनाशक गर्भधारणा तपासणी इत्यादी कामे ग्रामपंचायतच्या प्रांगणात करण्यात आली असल्याची माहिती विजय वडजे यांनी दिली आहे
तालुक्यातील शेळगाव छत्री येथे सदरच्या लसीकरणाच्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना लंपी रोगाचे लक्षण व उपाय यावर मार्गदर्शन कृषी  कन्या महाविद्यालय रावे विद्यार्थिनींच्या वतीने करण्यात आले आहे

यावेळी पशु वैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. साळवे यांच्यासह त्यांची विशेष टीम या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती
सदरील कार्यक्रम अधिकारी प्रा.दुर्गा चाटसे कृषी  कन्या महािद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.आचल शंभरकर यांनी आवर्जून उपस्थित होत्या
हा लसीकरण यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी
सदरच्या टीमणेने मोठे परिश्रम घेतले आहे 

विद्यार्थिनी निकिता लवटे मनाली मालस सुप्रजा नरम खुशबू नरोटे कल्पना पाटील प्रणया पाटील संद्या पाटील गीतांजली पोटेवार श्रीलेखा पुरुषोत्तम जुगनी शेरकी पूजा सातपुते नम्रता सूर्यवंशी सुकन्या ठीपासनी पल्लवी उपलंम स्वाती वेट्टी या सर्व कृषी कन्यांनी अथक परिश्रम घेतले आहे





Post a Comment

0 Comments