नायगाव शहरातील ये तो ट्रायलर है पिक्चर और बाकी है काही दिवसात अवैध धंदे करणाऱ्यावर पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचे सर्जिकल स्ट्रीक होणार ? असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुट्टे यांची बदली झाल्याच्या नंतर याच पोलीस ठाण्याला एका दमदार पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी पदभार स्वीकारताच नायगाव शहरात एक महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेऊन पहिल्या प्रथम शहरात व राज्य महामार्गावर बिनधास्तपणे वाहन चालवणाऱ्या मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे
या सदरच्या कारवाईमुळे नायगाव पोलीस ठाण्याचे दमदार नेतृत्वाचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी पोलीस म्हणजे काय असते अशी चुणूक शहरात दाखविण्यास सुरुवात केली असल्यामुळे येतो ट्रेलर हे पिक्चर और बाकी है अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नायगाव शहरासह इतर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या व पोलिसांच्या नजरा चुकून अवैध धंदे करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल त्यांच्यावर ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांचे काही दिवसातच सर्जिकल स्ट्राइक होण्याची शक्यता ? वर्तवली जात आहे
नायगाव पोलिसांची धास्ती आणि अवैध धंदे करणाऱ्याच्या उरात भरली धडकी अशी ही चर्चा रंगायला लागली आहे
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी नायगावात शहरात अतिशय महत्त्वाची मोहीम हाती घेतल्यामुळे अनेकांचे धाबे दणावले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत असले तरी काही दिवसात असे दिसून येणार " अरे भागो सिंगम आया है " अशी धमक नूतन पोलीस निरीक्षकात असल्यामुळे शहरात व त्यांच्या कार्यक्षेत्रात शांततामय वातावरण निर्माण होईल असे सध्या तरी वास्तव चित्र दिसून येत आहे
याच पोलीस ठाण्यामध्ये तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून तात्पुरती नेमणूक करण्यात आलेले जगताप यांनी सुद्धा त्या काळी निवडणूकीचा निकाल लागल्याच्या नंतर कोणी शहरात मोटार सायकलचे सायलन्सर काढून व तीन ते चार लोक मोटार सायकलवर फिरणाऱ्या वहानावर अशीच पोलीस कारवाई केली होती त्याच पद्धतीने नूतन पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी धडाकेबाज कारवाईचे शस्त्र हाती घेतले आहे

0 Comments