नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एमआयडीसी कृष्णुर व अन्य ठिकाणी म्हणजे कंपन्या मध्ये बाहेर राज्यातील मजूर वर्ग व नागरिक वास्तव्यास असल्यामुळे त्यांनी आपले आधार कार्ड व ओळख पत्र कुंटूर पोलीस ठाण्यात आणून त्याची नाव नोंदणी करून घ्यावे असे आवाहन कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नागोराव बहात्तरे यांनी केले आहे नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावा पैकी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर बाहेर राज्यातील म्हणजे उत्तर प्रदेश असो की अन्य ठिकाणच्या राज्यातील नागरिक असो या राज्यातील नागरिक अनेक कंपन्यां मध्ये व विविध ठिकाणी काम करीत असल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात आपले नांव नोंदणी करणे गरजेचे आहे
कुंटूर पोलिसाची संबंधित घर मालकांना महत्वाची सूचना
अनोळखी माणसाला घर भाड्याने देत असताना त्या मालकांनी त्या कुटुंबाचे आधार कार्ड व ओळखपत्र पाहून घर भाड्याने द्यावेत कारण जेणेकरून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांची खात्रीदायक माहिती घर मालकासह पोलीस स्टेशनला नोंद असावी असे ही यावेळी कुंटूर पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे
बाहेर राज्यातील लोकांनी आपले आधार कार्ड व ओळखपत्र आणून रीतसर कुंटूर पोलीस ठाण्यात स्वतः येऊन नाव नोंदणी करावी यासाठी ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार व्यंकट रामचंद्र कसमे व बीट जमादार आर टी पवार यांनी सदरच्या लोकांना सूचना देऊन कळवीत आहेत
कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार व्यंकटी रामचंद्र कसमे व कृष्णुर / रुई बु बीटचे जमादार रामचंद्र पवार यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल अशोकराव घुमे यांनी सदरांच्या नागरिकांचा पोलीस विभागाच्या मार्फत शोध घेऊन त्यांना त्यांचे आधार कार्ड पोलीस ठाण्यात आणण्यासाठी व नाव नोंदणी करण्यासाठी सूचना देत आहेत

0 Comments