नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजगडनगर येथे काँग्रेस पक्षांचे उत्कृष्ट पणे काम करणारे शंकर गायकवाड यांच्या पॅनलच्या नूतन महिला सरपंच म्हणून सावित्रीबाई तेजराव चोंडे ह्या झाल्या आहेत
राजगडनगरच्या त्यापूर्वी अडीच वर्षांच्या कार्यकाळात महिला सरपंच म्हणून छायाताई श्रीधर पालनवार ह्या अडीच वर्षाचा कार्यकाळ चांगल्या प्रकारे सांभाळल्या आहेत
तालुक्यातील राजगडनगर ग्रामपंचायत कार्यालयाच्या माजी महिला सरपंच छायाताई श्रीधर पालनवार यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे पुढील अडीच वर्षासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गटाचे पॅनल प्रमुख शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राजगड नगरच्या महिला विद्यमान सरपंच सावित्रीबाई तेजराव चोंडे ह्या गावच्या कारभारी म्हणून विराजमान झाल्या आहेत
माजी आमदार पुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजगड नगरच्या नूतन महिला सरपंच व सदस्यांचा नायगावच्या संपर्क कार्यालयात विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले आहे
यावेळी महिला नूतन सरपंच यांना त्यांच्या भावी कार्यासाठी भरगच्च शुभेच्छा भावी आमदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी दिले आहेत
यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून विस्तारधिकारी कानोडे यानी काम पाहीले आहे ग्रामसेवक व्ही. व्ही. एरपलवाड, गावातीतील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी चोंडे, शंकर गायकवाड, राहुल झगडे, गंगाधर झगडे , गंगाधर हंगरगे, योगेश शेळगावे, व्यंकट चोंडे परमेश्वर गायकवाड आदीनी नुतन महिला सरपंचाचे अभिनंदन केले व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments