हिमायतनगर नागोराव शिंदे - सरसेनापती नेताजी पालकर यांची हदगाव तालुक्यातील तामसा येथे असलेल्या समाधीस्थळाची दुरवस्था झाली होती.
स्थानिक नागरीकांनी या कामी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे धाव घेतल्यानंतर समाधीस्थळाच्या विकासाकरिता खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन समाधीस्थळाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी केली होती त्यांच्या मागणीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० लाख रुपयाच्या निधीस मंजुरी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत असलेले प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांचे समाधीस्थळ हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी आहे
त्यांच्या समाधीस्थळाच्या ठिकाणी स्मारक व्हावे, हे स्मारक येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल आणि सरसेनापती नेताजी पालकर यांच्या कार्याचा त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाचा उचित गौरव व्हावा, अशी मागणी देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती
त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन समाधीस्थळ परिसरात नेताजी पालकर यांचे भव्य स्मारक, सभागृह बांधकाम, परिसराचे सुशोभिकरण अशा विविध विकास कामाकरिता ५० लाखाचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करुन दिला आहे. या कामाच्या मंजुरीमुळे गावकरी परिसरातील शिवभक्त, तरुण कार्यकर्ते, इतिहासकार व संशोधक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे
सर्व स्तरातून खासदार हेमंत पाटील यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
"प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेत सर्वात जास्त मुघलांचा अन्याय सहन केला आहे. अशा या लढवय्या सरसेनापती नेताजी पालकर यांच्या समाधीस्थळाच्या विकासा करिता राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हे स्मारक महाराष्ट्रातील तमाम जनतेकरिता आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे

0 Comments