बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या थडी बोरगाव येथील रहिवासी असलेला एका अल्पवयीन मुलीस पूस लावून पळून नेल्या प्रकरणी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रामतीर्थ ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून पोलिसांनी सदरच्या सैराट जोडीला पुणे येथून जेर बंद केले असल्याची माहिती सपोनि दिघे यांनी दिली आहे
तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील थडी बोरगाव असून येथील सैराट मुलाने एका अल्पवयीन मुलीस पूस लावून पळविले असल्याची तक्रार मुलीच्या आईने रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिल्या वरून ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते
यात ठाण्याचे जमादार तमलुरे,भवनगिरकर यांनी पुण्यातून दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी १२ वाजता ताब्यात घेतले आहे
रामतीर्थ पोलिसांनी थडी बोरगाव येथील या सैराट जोडीला जेरबंद केल्याच्या नंतर दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धम्मदीप बापूराव सोनकांबळे यांच्या विरोध अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२६/ २०२३ कलम ३६३,३६४, अ ३७६(३) एन आयपीसी बरोबर ४,६,८,१२ पोस्को ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरील प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे करत आहेत

0 Comments