नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी दिलीपराव धर्माधिकारी यांची नुकतीच निवड झाली आहे
काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्यावतीने धर्माधिकारी यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा नगरीचे सुपुत्र दिलीपराव धर्माधिकारी यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाची माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह बरबड्याची विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे श्रीधर पाटील चव्हाण प्राचार्य गोविंदराव मेथी अगदी या सत्कार प्रसंगी उपस्थित होते
नायगाव तालुक्यातील बरबडा हे गाव राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या अक्षरशा नजरेत असल्यामुळे व चर्चेत असल्यामुळे आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सदरची करण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामीण भागात आत्ताच चांगलेच बळ मिळणार आहे

0 Comments