Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्यामुळे मिळणार पक्षाला संजीवनी !!

          माधव पवार 
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात बरबड्याचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी प्रवेश केल्याच्या काही काळातच त्यांची नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच संजीवनी मिळणार असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहेत

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विशेष उपस्थिती मध्ये दिलीपराव धर्माधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता

त्या पाठोपाठ धर्माधिकारी बरबडेकर यांची नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असल्याने त्यांच्या राजकीय शक्ती मधून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच बळ मिळणार आहे

आगामी काळातील लोकसभा व विधानसभा त्याच बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांची राष्ट्रवादीच्या नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

सन २०२४ होऊ घातलेल्या निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्यामुळे मोठी ताकद पक्षाला मिळणार आहे

Post a Comment

0 Comments