Header Ads Widget

पी एम किसान सन्मान योजनेत नावे समाविष्ट करण्याची शिवराज पा. होटाळकर यांच्या नेत्रत्वाखाली तहसीलदाराकडे मागणी

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे : 

भाजप सरकारच्या शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या या पी.एम. किसान सन्मान योजनेमुळे देशभरातील शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक सहा हाजर रूपये मदत थेट खात्यात जमा होते आहे

पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेत समाविष्ट शेतकर्‍यांची नावे  वगळल्याने  त्याना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच नवीन सातबारा उताऱ्यावर आलेल्या शेतकर्‍यांची नावे या योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया चालू नसल्याने याही शेतकर्‍यांना या योजनेपासून दूर राहावे लागत आहे.
   
या सर्वाना या पी.एम किसान योजनेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी मा.श्री.शिवराज पाटील होटाळकर (माजी शिक्षण सभापती तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नांदेड) यांच्या नेतृत्वाखाली नायगांव तहसीलदार मंजुषा भगत  यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे

यावेळी उपस्थित शंकर कौठकर, हनमंत मनूरे, महेश देशपांडे, भाऊ पाटील चव्हाण,  प्रदीप देमेवार,  दिपक पाटील रुईकर, सटवाजी मोदलवाड, रामदास पाटील भाकरे, गोविंद पाटील डाकोरे, माधव उपासे, मंगेश पाटील बेंद्रीकर, सुरेश पाटील कदम, त्र्यंबक पाटील आदी उपस्थित होते 

यावेळी गुरुनाथ पाटील शिंदे, शिवराज पवळे,दत्तहरी मनुरे, श्रीकांत पाटील शिंदे, दादाराव बेलकर, मुकिन पिंजारी, शिवाजी पाटील ढगे, रामदास पाटील वडजे, संजय बन, बाबाराव पपुलवाड आदिंसह नायगाव परिसरातील शेतकरी व भाजपा कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments