Header Ads Widget

शेतकऱ्यासह जनसामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझं तहसील प्रशासन सज्ज - तहसीलदार मंजूषाताई भगत -

           माधव पवार 
नायगाव तालुक्यात एकूण ८९ गावे असल्यामुळे व सदरचे गावे सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी माझ तहसील प्रशासन सक्षम असल्याचे नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी सांगितल्या आहे

महसूल प्रशासनातील कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असल्यामुळे वेळोवेळी काम पूर्ण सदरचे कर्मचारी करत असून  कोणत्या ही नागरिकांची गैरसोय पुढे होणार नाही यांची ग्वाही तहसीलदार भगत यांनी दिली आहे

तालुक्यातील नागरिकांना कार्यालयात आल्याच्या नंतर त्यांच्या सन्मानपूर्वक समस्या ऐकून घेऊन त्यांच्यावर तोडगा काढण्यासाठी माझ तहसील प्रशासन सक्षम असल्याचे ही त्यांनी सांगितले असून तहसील मधील कोणत्या ही कार्यक्षेत्रात असलेला कर्मचारी नागरिकांचे कामे अडवण्याचा प्रयत्न करणार नाही व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल अशा ही तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी सांगिल्या आहेत

नायगाव तहसील प्रशासन हे गोरगरीब जनतेसह शेतकऱ्यांचे कामे करण्यासाठी असल्यामुळे कोणत्या ही शेतकऱ्यांचे कामे खोळबंणार नाहीत निराधारांचा प्रश्न असेल दिव्यांगाचा प्रश्न असेल वय वृद्ध लोकांचा प्रश्न असेल पंतप्रधान सन्मान योजनेचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांचा सन्मानपूर्वक विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तहसीलदार मनीषाताई भगत यांनी करणार आहेत 

Post a Comment

0 Comments