नायगाव तालुक्यातील बळेगाव ते घुंगराळा रुई रस्त्याचे काम गुत्तेदाराच्या मार्फत वेगात चालत असले तरी रुई बु.येथे बंगल्या पासून ते ओढ्या पर्यंत काँक्रेटचा रस्ता असल्यामुळे बस स्टॅन्ड जवळ व अनेक ठिकाणी रस्ता अरुंद होत आहे
रस्त्याचे रुंदीकरण व दोन्ही बाजूने पाणी जाण्यासाठी अंडरग्राउंड नाल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या कडून कधी बांधल्या जातील व रुंदीकरण कधी करण्यात येईल असी चर्चा गावकऱ्यात होताना ऐकावयास मिळत आहे
रुई बु.च्या बस स्टॅन्ड जवळील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात गावातील राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे येऊन रस्ता रुंदीकरण करण्यासाठी व सदरचा रस्ता रुंदीकरण व नाली बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला सूचना कराव्यात अशी अपेक्षा काही नगरिकातुन होत आहे
तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई रस्ता हा गेल्या अनेक वर्षापासून बेवारस होता परंतु सध्याच्या परिस्थितीत रस्त्याचे काम नामांकित गुत्तेदार मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या मार्फत करण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अतिशय गतिमान होत आहे
रुई बु जवळ सदरचा रस्ता रुंद झाला पाहिजे व पाणी जाण्यासाठी नालीचे बांधकाम करणे अतिशय आवश्यक असून काही ठिकाणी झालेले अतिक्रमण काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता रुंद करावा असे गावकऱ्यासह बालाजी भुजंगा पवार यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना मागणी केली आहे
घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ता दर्जेदार करून घेण्यासाठी स्वतः गुत्तेदार मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या कडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे
रुई जवळील बस स्टॅन्ड येथे काँक्रेटचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूने अंडरग्राउंड नाल्या बांधण्याचे अत्यंत गरजेचे असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून येथील रस्ता रुंदीकरण व नाल्या बांधकाम करण्याच्या संदर्भात नाल्या खोदून रस्ता मजबूत करावा अशी ही मागणी होत आहे

0 Comments