Header Ads Widget

सावधान : मोटार सायकलवर स्टॅन्ड बाजी करणाऱ्या धारकावर पोलीस कारवाई होणार - पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व दमदार कामगिरी बजावणारे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांचे नवतरुण वर्गातील मोटर सायकल चालकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहेग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्या ही मोटार सायकल चालकांनी रस्त्यावर स्टंटबाजी करू नये अथवा कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक भंडरवार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या 
सदरच्या नव तरुणांनी मोटर सायकल चालवताना कोणी ही स्टंटबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये आणि दुसऱ्याचा ही जीव धोक्यात घालू नयेत जर कोणी स्टंटबाजी करून मोटार सायकल चालवण्याचा प्रयत्न केल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे
ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी नवतरुण स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना सावधान त्याचा इशारा दिला आहे

जिल्ह्यात व ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण स्टंटबाजीमुळे वाढले असल्याने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने ठाण्याचे दमदार पोलीस अधिकारी जगदीश भंडरवार यांनी रस्तावर होणारे अपघात टाळण्यासाठी अतिशय महत्त्वाची मोहीम हाती घेतली  आहे

स्टंटबाजी करणाऱ्या नव तरुणानी दिलेल्या सावधान तेच्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याची गरज असून स्टंटबाजी करणाऱ्या नवतरुणाकडे ग्रामीण पोलिसांचे लक्ष असल्याचे ही पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments