माधव पवार
कृष्णुर येथे साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याचे निमित्ताने कार्यकारनी जाहीर करण्यात आली यावेळी अध्यक्ष म्हणून माधव वाघमारे तर उपाध्यक्ष गणेशराव वाघमारे यांची निवड सर्व समाज बांधवानी केली आहे
या महत्वपूर्ण कार्यकारणीतील कोषाध्याक्ष चांदु शेट्टीबा वाघमारे सचिव गोपाळ रावण वाघमारे सहकोषाध्यक्ष लक्ष्मण आनंदा वाघमारे सह सचिव बालाजी अर्जुन वाघमारे यांच्यासह एन एस वाघमारे माधव कामाजी वाघमारे सचिन गणपती वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे
नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णुर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र येवून महत्वाची बैठक घेतली आहे
या बैठकीत झालेले चर्चेच्या माध्यमातून आण्णाभाऊची जयंती शांततेत पार पाडण्याची संदर्भात विचार विनिमय करण्यात आला आणि सर्व बांधवाच्या उपस्थिती जयंती मंडळाचे अध्यक्ष माधव काळबा वाघमारे तर उपध्याक्ष म्हणून गणेशराव काळबा वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे
तालुक्यातील कृष्णूर येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा भव्य जयंती सोहळा दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साहात साजरा होणार असल्यामुळे या कार्यक्रमाला अनेक विशेष मान्य वरांची उपस्थिती लाभणार असल्यामुळे हा जयंती सोहळा पाहण्यासाठी व साजरा करण्यासाठी नायागांव तालुक्यातील सर्व समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन कृष्णुरच्या जयंती मंडळाच्या संयोजकानी केले आहे

0 Comments