Header Ads Widget

नायगाव विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता व निलेश देशमुख यांच्यात सिंगल ट्रान्सफॉर्मर देण्याच्या करणा वरून शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा ? -

                 माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी नायगाव विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता यांना दलित वस्तीसाठी सिंगल फेजचे ट्रान्सफर देण्याच्या संदर्भात विनंती व सूचना अनेक वेळा करून सुद्धा देत नसल्यामुळे सदरच्या अभियंत्याच्या कार्यालयात जाऊन परत एकदा विनंती केली असताना सदरच्या अधिकाऱ्यानी बेताल वक्तव्य करून बोलू लागले आहे 

सदरच्या अभियंत्याने माझ्याने सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर देणे होत नाही ऑफिस मधून बाहेर जा देगलूरला जा अन्यथा पोलीस कारवाई करतो अशी धमकी देताच निलेश देशमुख व उपभियंत्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली असल्याची चर्चा नायगाव तालुक्यात रंगायला लागली आहे

तालुक्यातील रुई बु.येथील दलित वस्ती ही गेल्या तीन ते चार दिवसापासून अंधारात असल्यामुळे सिंगल फेसचे  ट्रान्सफर देण्यात यावे यासाठी उप अभियंत्याला संपर्क करून ही सदरच्या अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यानी देण्यासाठी मज्जाव घालत असल्याचा आरोप निलेश देशमुख यांनी केला आहे

सदरच्या उप अभियंता कडून बेताल वक्तव्य होत असल्यामुळे अखेर रुई बु येथील सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी थेट नायगावच्या विद्युत वितरण कार्यालयात जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु सदरचे उपअभियंता यांनी सांगत असलेले कारण समजून न घेता थेट पोलीस कारवाई करण्याची धमकी ? दिली असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी शब्दिक चकमक उडाली आहे

रुई बु येथील ग्रामपंचायत कार्यालया कडून विद्युत वितरण कंपनीचे थकीत असलेले ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी यांनी भरले असताना सुद्धा सदरचे ट्रान्स फार्मर उप अभियंता देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निलेश देशमुख यांचे म्हणे असून सदरच्या उप अभियंत्यानी तात्काळ दलित वस्तीसाठी तीन पंचवीसचे ट्रान्सफॉर्मर देण्यात यावे अशी निलेश देशमुख यांनी मागणी करत आहे

नायगावच्या उप अभियंत्यासह देशमुख यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगत आहे 


Post a Comment

0 Comments