नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावांमध्ये दिनांक १ ऑगस्ट २०२३ पासून साहित्यरत्न साहित्याचे शिरोमणी साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आहे
जयंती सोहळ्यात वाजवला जाणारा डीजे यांचा मिक्सर बेश कंट्रोल ठेवा अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षण विशाल बहातरे यांनी जयंती मंडळाच्या अध्यक्षाना दिली आहे
महापुरुषाच्या जयंती सोहळ्यात वाजविला जाणारा डीजेचा मिक्सर बेस कंट्रोल ठेवा अन्यथा कारवाई करण्यात येईल असे जयंती मंडळाच्या अध्यक्षांना कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी आयोजित करण्यात आलेल्या कुंटूर पोलीस ठाण्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी एक वाजण्याच्या दरम्यान ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ४५ गावातील सरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष तसेच प्रतिष्ठित नागरिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याचे विद्यमान अध्यक्ष व कार्यकरणीतील अधिकारी व पदधिकारी या महत्वपूर्ण शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावातील जयंती मंडळाच्या अध्यक्षांना शांतता कमिटीच्या बैठकीत महत्त्वाची सूचना करण्यात आली जयंती सोहळ्याच्या मिरवणुकी मध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावकऱ्यासह जयंती मंडळाच्या अध्यक्षांनी व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी काळजी जास्तीची घेऊन महापुरुषांची जयंती साजरी करणे आवश्यक असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नागोराव बहातरे यांनी म्हटले आहे
जयंती मंडळाच्या अध्यक्षासह त्यांच्या कार्यकारणीतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जयंती सोहळ्याला नेमून दिलेल्या वेळे नुसार व वेळेच्या आत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊसाठे या महापुरुषाची जयंती अतिशय शांततेत व उत्साहात साजरी करावी असे कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि बहातरे यांनी जयंती मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांना आवाहन केले आहे

0 Comments