Header Ads Widget

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढे नेण्यासाठी - तत्कालीन शाखा अधिकारी हंगरगे यांच्यासह वानोळे यांचे योगदान

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व हितासाठी असल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास बँकेवर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बँक खातेदार समाधान व्यक्त करीत असून या बँकेचा आर्थिक व्यवहार टकाटक चालत असल्यामुळे सदरील बँकेचा विश्वास जनसामान्य माणसात रुजला असल्याची माहिती तत्कालीन शाखाधिकारी वानोळे यांनी दिली आहे

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढे नेण्यासाठी  तत्कालीन शाखा अधिकारी हंगरगे यांच्यासह वानोळे यांचे योगदान असल्यामुळे सदरील बँकेचा विश्वास शेतकऱ्यात व बँकेच्या खातेदारात वाढला आहे 

तालुक्यातील कुंटूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही इतर बँकेच्या तुलनेत पाहिले तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व हितासाठी सदरची बँक कार्य करत असते कुंटूर शाखेचे तत्कालीन शाखा अधिकारी यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे नांदेड जिल्ह्यात नंबर एकच्या दिशेने सदरची बँक चालत असल्यामुळे सदरचे तत्कालीन शाखा अधिकारी एम आर हंगरगे यांच्यासह शाखा अधिकारी वानोळे यांनी सदरची बँक सुरळीत चालवण्यासाठी मोठी कसरत केली आहे

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नामुळे सदरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचा कारभार सुरळीत पद्धतीने चालत असल्यामुळे व सदरच्या बँकेत कार्यरत असलेले कर्मचारी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन बँकेचा आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे चालविला आहे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असल्याने कुंटूरची शाखा ही जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments