संस्कार, गुणवत्ता व प्रगती या तीन गुणांनी परिपूर्ण असलेले जि.प.हा.विष्णुपूरीचे विद्यार्थी प्रिय शिक्षक आनंद वळगे यांचा जन्मदिवस विद्यार्थ्यांच्या साक्षीने आज दि.२ ऑगस्ट २०२३ रोजी शाळेत साजरा करण्यात आला आहे
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त साक्षीने विद्यार्थी प्रिय शिक्षक आनंद वळगे यांचा सत्कार संपन्न शिक्षक कभी कमजोर नहीं होता,सृजन उसकी गोदमे खेलता है । आर्य चाणक्याच्या याच सुविचाराचा प्रत्यय येणारे शिक्षक म्हणजे आनंद वळगे आहेत
मुळातच स्वतः वळगे हे नवोदय विद्यालयाचे सर्वगुणसंपन्न विद्यार्थी होत. आपले सर्व गुण त्यांनी आचरणातून व अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवल्यामुळे सहकारी, पालक,विद्यार्थी, प्रशासनात एक वेगळीच छाप वळगे यांची निर्माण झाली आहे
प्रत्यक्ष अभ्यासपूर्ण, आपुलकीचे अध्यापन करीत असल्यामुळे अल्पावधीतच विष्णुपूरी व परिसरात सर विद्यार्थी तथा पालक प्रिय शिक्षक म्हणून सुप्रसिद्ध झाले आहेत.
सेमी इंग्रजी माध्यमातील सायन्स विषय अध्यापन करण्यात त्यांचा हातखंडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच जानापूरी,डेरला,झरी इत्यादी गावातील विद्यार्थी खास सेमी इंग्रजी माध्यमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विष्णुपूरी प्रशालेत प्रवेश घेत आहेत.
या शिवाय एनयमयमयस, शिष्यवृत्ती, नवोदय अशा अनेक स्पर्धा परीक्षेचे उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून सुध्दा सरांनी ख्याती मिळवली आहे.
अशा बहुश्रुत,बहुआयामी,सृजनशील शिक्षकाचा जन्मदिवस आज विद्यार्थ्यांच्या साक्षीने विष्णुपूरी शाळेत उत्साहात साजरा करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत
जवाहर नवोदय विद्यालय येथील सर्व माजी विद्यार्थी प्रतिनिधी डॉ. इरवंत पल्लेवांड व सर्व नवोदय मित्रांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

0 Comments