Header Ads Widget

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बिलोली ते नरसी रस्त्यावर झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी - सपोनि संकेत दिघे यांची माहिती

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नरसी रोडवर टिप्पर आणि मोटरसायकलच्या झालेल्या जब्बर धडकेत मोर इकळीचा एक जण जागीच ठार तर दुसरा जखमी झाला आहे

सदरची घटना दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान नरसी ते बिलोली रस्त्यावर घडली असल्याची माहिती सपोनि संकेत दिघे यांनी दिली आहे

बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नरसी ते बिलोली रस्त्यावर झालेल्या मोटरसायकल व टिपरच्या धडकेत मोर इकळी येथील ज्ञानेश्वर भीमराव मोरे ३६ वर्ष व व्‍यंकटी सखाराम वडजे वय पन्नास वर्षे हे दोघे जण राहणार मोर इकळी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत
सदरच्या अपघातातील मोटार सायकल क्रमांक एम एच २६ बी यु १२३१ वर नरसी कडून लोहगाव फाटा मार्गे त्यांच्या गावी म्हणजे मोर इकळी गावाकडे जात असताना लोहगाव फाटा येथे वाटेत एक ना दुरुस्त असलेला रेतीचा टिपर क्रमांक एम एच २४ ए यु १५५६ याला मोटार सायकलची जब्बर धडक लागली असल्यामुळे यात एक जण ठार झाला तर दुसरा जखमी झाला असल्याची घटना घडली आहे

रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेत ज्ञानेश्वर भीमराव मोरे राहणार मोर इकळी हा जागीच ठार झाला तर दुसरा व्‍यंकटी सखाराम वडजे हा गंभीर जखमी झाला आहे

लोहगाव फाट्यावर सदरची ही दुर्दैवी घटना घडली असून सदरील घटनेची माहिती रामतीर्थ पोलीसांना मिळताच  ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरवाडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी रवाना होऊन घटनेची पाहणी केली व पुढील तपास रामतीर्थ पोलीस करीत आहेत 





Post a Comment

0 Comments