Header Ads Widget

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून तहसीलदाराना निवेदन देण्यात येणार !!

               माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नायगावच्या तहसीलदारांना निवेदन दिले जाणार असल्यामुळे योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे 

तालुक्यातील ८९ गावाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजने अंतर्गत दोन हजार रुपये चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात तर वर्षाला सहा हजार रुपये शेतकरी बांधव सदरच्या सन्मान योजनेचा लाभ घेत असला तरी या नायगाव तालुक्यातील अनेक शेतकरी सदरच्या लाभापासून वंचित असल्यामुळे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगावच्या तहसीलदारांना आज निवेदन देणार आहेत

या तालुक्यातील व खेड्यापाड्यातील शेतकरी बांधवांनी नायगावच्या तहसील कार्यालयाच्या संबंधित विभागाकडे सदरच्या पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज बाजारी केले येथील संबंधित विभागाकडे देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या फायली धूळ खात असल्यामुळे त्यांची चौकशी होऊन तात्काळ पात्र शेतकऱ्यांना सदरच्या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा म्हणून शिवराज पाटील होटाळकर यांनी प्रयत्न करीत तहसीलदाराना निवेदन दिले जाणार आहे





Post a Comment

0 Comments