Header Ads Widget

तहसील कार्यलयाचा काडीमात्र संबंध नसलेल्या व्यक्तीकडूनखडणीची मागणी नायगावात खंडणीचा गुन्हा दाखल - फौजदार बाचावार यांच्या कडून तपास जारी -

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे - 

तहसिलदार यांनी चढवलेला शेतीवरील बोजा काढुन देण्यासाठी कुठल्याही खात्याशी कसलाही संबंध नसलेल्या त्रयस्थ व्यक्तीकडून दोन लाखाची मागणी केल्या बाबत नायगांव पोलिसात मुंबई ऑक्टर्स एकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   
याबाबत अधिक वृत्त असे की, दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी चे १३.३० ते १४.३० वा. चे दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय समोर रोडवर नायगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपी राजरत्न डुंमणे याने फिर्यादीचे मौजे सुजलेगाव येथील जमिनीवर मा. तहसीलदार नायगाव यांनी आरोपीने दिलेल्या तक्रारी अर्जावरून बोजा चढविला होता. 
   
तो बोजा काढुन घेण्याकरीता दोन लाख रूपयाची खंडणीची मागणी केली होती. त्यानुसार तू जर मला दोन लाख रूपये खंडणी नाही दिले तर तुझी जमीन जप्त करायला लावतो व तुला जेलमध्ये टाकायला लावतो अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती.

वगैरे फिर्यादी सुभाष गंगाराम नव्हारे वय ४९ वर्षे, रा. सुजलेगाव ता. नायगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नायगांव गुरनं १२५ /२०२३  कलम ३९५  भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक ओम नाथ चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे


.

Post a Comment

0 Comments