हिमायतनगर : नागोराव शिंदे -
दि २१/0८/२०२३रोजी शिवणी येथे एका छोटेखानी कार्यक्रमात वर्धमान संस्कार धाम, मुंबई मार्फत २ लक्ष रूपयांच्या चेकचे वितरण करून सन्मान करण्यात आला आहे.
हल्ला झाला त्यावेळी २ लक्ष रूपये, दवाखान्यातील खर्चासाठी २ लक्ष रूपये, शहिद शेखर रापेल्ली यांच्या कुटुंबीयांना अगोदर २लक्ष आणि आज ३ लक्ष रूपयाचा धनादेश देण्याची घोषणा श्री राजुभाई शहा, वर्धमान संस्कार धाम, मुंबई यांनी केली आहे.
यावेळी ते म्हणाले हे मदत नसुन आपण केलेल्या धाडसी कार्याचा सन्मान आहे, आपल्या सारख्या शुर गोरक्षक कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आपल्या या पारदर्शक प्रामाणीक गोरक्षणाच्या लढाईत सदैव सोबत आहोत.
किरण बिच्चेवार यांच्या संपर्कात आम्ही २०१६-१७ पासुनच आहोत न्यायालयीन संघर्षात त्यांचे खुप मोठे योगदान आहे. आज सबंध महाराष्ट्रात बिच्चेवार सारखा कार्यकर्ता शोधुनही सापडणार नाही. गोरक्षा व गोसेवा करतांना अत्यंत प्रतीकुल परीस्थितीचा सामना करत हे सर्व सांभाळणे अतिशय कठीण काम आहे
ते काम असंख्य विश्वासु प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बिच्चेवार मागच्या ७ वर्षांपासुन अविरतपणे करत आलेले आहेत, याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मागच्या ७ वर्षांपासुन मी बिच्चेवार यांची काम करण्याची धडपड बघत आलोय, ते कधीच घाबरले नाहीत, दबावाला किंवा अमिषाला बळी पडले नाहीत,
संघर्षाला घाबरलेले बघले नाही, न थकता, न रडता हे गोरक्षा आणि गोसेवा अविरतपणे चालु ठेवणाऱ्या या सामान्यातील असामान्य कामगिरी करणारे किरण बिच्चेवार यांना भावी कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा.दिल्या

0 Comments