Header Ads Widget

खबरदार : मोटार सायकल चालवताना हुलडबाजी केलात तर व रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांचा इशारा ७३ वहानावर कारवाई ३८ हजार ५०० रुपया दंड !!


माधव पवार / मधुकर जवळे - 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्याचा नुकताच परभार स्वीकारले ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी मोटरसायकलवर हूडलबाजी व रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांची चांगलीच झोप उडवली आहे
नायगाव पोलिसांची चांगलीच धास्ती आता बसली असल्यामुळे खबरदार कोणी शहरात व नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या डॉ हेडगेवार चौकात मोटर सायकलवर हूलडबाजी करून व रस्त्यात अडथळा निर्माण केल्यास त्यांची गैर केले जाणार नाही असा पुणे चिंचोलकर यांनी दिलेला आहे 

दिनांक १८ ऑगस्ट २०२३ परत एकदा शहरात नायगाव पोलिसांनी  धडाकेबाज मोहीम राबवून पाच जनावर गुन्हे दाखल तर शेकडो वाहणावर कारवाही करून हजारोची दंडात्मक कारवाही करण्यात आली दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी पुन्हा एकदा नायगाव पोलीस ठाण्याचे दमदार कामगिरी बजावत असलेले पोलिस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला फौज फाटा घेऊन रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचा सपाटा उठविल्यामुळे रस्ते मोकळा श्वास घेताना दिसत आहेतयामध्ये रस्त्यात अडथळा करणारे येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होईल अशा पद्धतीने वर्तणूक करणारे हातगाडी वाले वाहन  दुकानांमधील माल रोडवर ठेवणारे, दुकानाच्या पाट्या बोर्ड रोडवर ठेवणारे जे वारंवार सांगूनही ऐकत नाहीत अश्या एकूण ५ आरोपीवर भारतीय दंड विधान कलम २८३ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून इतरांना तंबी देऊन नोटीस देण्यात आली आहे.

तसेच शहरामध्ये शाळा कॉलेज परिसरात विनाकारण फिरणारे रोड रोमिओ, यांना चोप देऊन  त्यांच्या वाहनाची कागदपत्रे चेक करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरामध्ये विनाकारण फिरणारे गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणारे रोडवर गाडी उभी करणारे यांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शाळा कॉलेज क्लासेस परिसरामध्ये विनाकारण फिरणारे तवालक्या करत बसणारे टुकार यांना चांगला चोप देऊन कारवाही करण्यात आली.

Post a Comment

0 Comments