Header Ads Widget

ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्याचे काम कुठे चालू तर कुठे बंद !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतला व गावच्या नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे व उन्हाळ्यात पाण्याची पाणी टंचाई निर्माण होऊन लोकांची रानोमाळ भटकंती होऊ नये म्हणून शासनाने जवळ पास एक कोटी रुपयाचे वर जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे कामे मंजूर केले असले तरी सदरचे कामे कुठे चालू तर कुठे बंद अवस्थेत आहेत

तालुक्यातील जल जीवन मशीन अंतर्गत कामे मंजूर करण्यात आलेल्या गावातील सदरील कामे ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद नांदेड नायगावच्या अधिकाऱ्यानी लक्ष देऊन कामे चालू ठेवण्यासाठी ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकाला सूचना करावेत जेणे करून सदरच्या कामाला वेळ लागणार नाही यांची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे

सावरखेड येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या टॉकीचे बांधकामासह विहिरीचे काम पूर्ण झाले असून फक्त गावा अंतर्गत पाईल लाईन करणे बाक्की असल्याचे सावरखेडचे ग्रामसेवक एन डी माने यांनी सांगितले गावच्या महिला सरपंच सौ जयश्री धोंडीबा इजगरे यांच्या सुचनेनुसार गुत्तेदारानी तडका फडकी काम केले आहे

जल जीवन मशीन अंतर्गत करण्यात येत असलेले कामे अनेक गावात बंद अवस्थेत तर काही गावात जवळ पास पूर्ण झाले असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असल्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी नायागांव यांनी कामे चालू करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक आणि गुत्तेदाराला आदेशित करावे अशी मागणी होत आहे 


Post a Comment

0 Comments