Header Ads Widget

नायगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे तहसीलदार मंजुषा भगत यांचे आदेश -

       माधव पवार
नायगाव तालुक्यात दिनांक २० जुलै २०२३ ते २७ ते २८ जुलै रोजी सतत धार पावसाने शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात यावे म्हणून नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी मंडळ अधिकारी व तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

तालुक्यातील व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेले शेतात जलमय पाणी कोंडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी प्रशासकीय दौरा करून स्वतः पाहणी केली आहे 
बरबडा नरसी मांजरम कुंटूर सर्कल मध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिशय नुकसान झाले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले असल्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्याच्या पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे म्हणून अनेक वेळा नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन  व्रत प्रकाशित करण्यात आले होते त्यांची दखल तहसीलदार भगत यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे 

Post a Comment

0 Comments