नायगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सदरील रस्त्याची कामे करण्यात यावे अशी मागणी वारंवार नागरिकांतून होत असली तरी कुंटूर ते बळेगाव इकळी माळ रस्त्याच्या डांबरी करणाला चिटकून तीन तीन फुटाची खडे पडले आहे
या मार्गा वरून जाणारी वाहतूक व रहदारी रात्री बे रात्री चालू असते परंतु कधी वाहनाला धोका होईल हे सांगता येत नाही व शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सदरचा रस्ता धोकादायक बनला आहे
तालुक्यांच्या रस्त्यासाठी अनेक कोटी रुपयांचा निधी आला असताना सुद्धा कुंटूर ते बळेगाव इकळीमाळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्यामुळे व काल परवाच्या पुराचे पाणी रस्त्यां मधून छिद्र करून गेले असल्यामुळे सदरचा रस्ता अगदी पोगर झाला असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे
कुंटूरच्या ओढ्यातील असलेल्या पुला जवळील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी पाहून घेण्याची गरज आहे
कुंटूर ते बळेगाव इकळीमाळ रस्त्यावरून राज्य परिवहन मंडळाची बसची सेवा चालू असल्यामुळे सदरचा रस्ता हा खालून पोगर झाला असल्याने या रस्त्यावर कधी ही अपघात होऊ शकतो त्यामुळे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्याची पाहणी करून सदरचा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे
सदरच्या मार्गाला लागून असलेल्या कुंटूर ते सालेगाव डोंगरगाव या मार्गावरील डांबरीकरण करण्यात आले त्याच रस्त्यावरून कुंटूर ते बळेगाव इकळीकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे या विभागांचे अधिकारी असून अडचण नसून कोळंबा असल्याची अवस्था या रस्त्याची झालेली दिसून येत आहे

0 Comments