Header Ads Widget

बरबडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या हलगर्जीपणामूळे वार्ड क्रमांक २ बेवारस ग्रामविकास अधिकारी नावालाच - सतीष हणमंते यांचा आरोप

         माधव पवार
बरबडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या हलगर्जीपणामूळे वार्ड क्रमांक २ बेवारस ग्रामविकास अधिकारी नावालाच - सतीष शिवाजीराव हणमंते यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केला आहे 

नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे येथील वार्ड क्रमांक २ रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे सदरचा वार्ड दोन बेवारस पद्धतीने राहत असून एकीकडे गावाचा विकास होत असल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे ग्रामविकास अधिकारी यांच्या बेजबाबदार पणामुळे वार्ड क्रमांक दोनच विकास बकास होत असल्याचा आरोप सतीष शिवाजीराव हणमंते यांनी केला आहे 

तालुक्यातील बरबडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वॉर्ड क्रमांक
२ मध्ये दलित वस्तीतील सर्वच कामे बोगस करून दलित निधी लाटाण्यात आला असल्याचा आरोप सतीश शिवाजीराव हणमंते यांनी करीत सदरील गुत्तेदाराने केलेली कामे एका वर्षात टिकू शकले नाहीत दलित वस्तीचा निधी बोगस कामाद्वारे हडपण्यात आला असल्याचे त्यांचे म्हणे आहे
 
बरबडा गावाचे ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोडंले यांना सदरील कामाबाबदची लेखी तक्रार देण्यात आली होती मात्र तक्रारीचे निवारण ग्रामपंचायत कार्यालयाने केली नाही बोगस कामाकडे ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोडंले यांचे साफ वार्ड क्रमांक २ कडे  दुर्लक्ष झाले असल्याचे आरोप कर्ते सतीश शिवाजीराव यांनी यांचे म्हणे आहे

वार्ड क्रमांक दोन कडे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे यांच्यासह उपसरपंच सौ छायाताई दिलीपराव धर्माधिकारी यांनी जास्तीचे लक्ष द्यावे अशी मागणी बरबड्याचे सतीश शिवाजीराव हणमंते यांनीकेली आहे 





Post a Comment

0 Comments