नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याच्या अंदाजा नुसार नांदेड जिल्ह्यात दिनांक २० जुलै २०२३ पासून सर्व तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हिमायतनगर तालुक्यात ढगफुटीचे स्वरूप आले असल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाले असल्याचे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन व्रत प्रकाशित करण्यात येत आहे
हिमायतनगर तालुक्यामध्ये दिनांक २० जुलै २०२३ रोजी रात्री नऊ ते दहाच्या वेळेत मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी दृश्य झाल्याने पळसपुर परिसरामधील हजारो हेक्टर वरील सोयाबीन कापूस तूर आधी पिके खरडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे चित्र दिसत आहेत
तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी राष्ट्रीय राज्य महामार्ग असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून केलेल्या रस्त्याचे जागोजागी उकडून खड्डे पडून नुकसान झाले आहे
तर काही ठिकाणी गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे पुलांचे आधारवड काम असल्याने लिंगा पुलावरील पाण्यामुळे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे
ढगफुटी दृश्य झाल्याने पळसपुर परिसरामध्ये वाहत असलेली पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे तर घोडे नाले यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान केल्याचे चित्र आहे

0 Comments