Header Ads Widget

केदारवडगावचे शेतकरी जयसिंग परशुराम जाधव यांची गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा :- !!

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे 

सततची नापिकी, थकीत कर्जामुळे तणावाखाली आलेल्या एका शेतकऱ्याने चुलत भावाच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नायगाव तालुक्यातील केदारवडगाव येथे २४ जूलै रोजी दुपारी उघडकीस आली आहे 
   
जयसिंग परशुराम जाधव वय ४५ रा. केदारवडगाव असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकन्याचे नाव आहे. केदारवडगाव शिवारात त्यांना पाच एकर शेती आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गडगा शाखेत त्यांच्या नावावर ६१ हजार १४ रुपये पीककर्ज आहे. सततच्या नापिकीमुळे कुटुंबात वाढलेल्या कर्जाने ते फेडण्याच्या तणावाखाली होते. 
   
त्यातच यंदा उशिरा झालेल्या पेरणीमुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही, या चिंतेत ते होते.२४ जुलै रोजी दुपारी त्यांनी चुलत भाऊ जळवा एकनाथ जाधव यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून जिवन संपविले. घटनेची माहिती पोलीस पाटील गिरी यांनी नायगाव पोलिसांना दिली आहे 

पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, अब्दुल गफूर शेख, बालाजी शिंदे आदींनी पंचनामा केला, जयसिंग जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे

Post a Comment

0 Comments