महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची धुरा उत्कृष्ट पणे सांभाळणारे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजीआमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात माजी आमदार चव्हाण यांच्या विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे
राज्यात येणाऱ्या आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची फळी मजबूत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी नायगावच्या संपर्क कार्यालयात अनेक कार्यकर्त्याना प्रवेश देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह त्यांचे सुपुत्र तथा भावी आमदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांच्या उपस्थितीत सदरचा पक्ष प्रवेश देण्यात आला आहे
माजी सरपंच खादर मिरासाब माजी उपसरपंच दशरथ पाटील आवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पाणीपुरवठा समिती अध्यक्ष गंगाधर पाटील आवरे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर पाटील कदम दत्ता हरी माली पाटील, आवरे मारोती पाटील कदम शेख वलीउद्दीन आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी आनंदा पाटील आवरे हनुमल्लू मामाभैरवाड पोशटी मामा शेख रहीम यावेळी धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता हरी पाटील, माजी उपसरपंच भीमराव पाटील कदम मोहनराव पाटील धुप्पेकर उपस्थित होते

0 Comments