विशेष प्रतिनिधी - बाळासाहेब पांडे
कै. संभाजी पवार शेतकरी उत्पादक कंपनी लि. नांदेडच्या वतीने नायगाव विधानसभा मतदारसंघातील नायगाव, उमरी व धर्माबाद या तिन्ही तालुक्यांतील ३,४३६ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम - २०२३ चा मोफत विमा उतरविण्यात आला आहे. दि. ३१ जुलैपर्यंत आणखी उर्वरित शेतकऱ्यांचा मोफत विमा उतरविला जाणार असल्याची माहिती माजी जि.प. सदस्या पुनमताई पवार यांनी दिली आहे.
आ. राजेश पवार व पुनमताई पवार या दांपत्याने गेल्या दहा-बारा वर्षांपासून मतदारसंघातील गोरगरीब महिला, पुरुष व शेतकऱ्यांसाठी स्वखर्चातून वेगवेगळे उपक्रम राबवून मदत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असून, या सामाजिक उपक्रमासोबत आ. पवार हे गेल्या चार वर्षांपासून आमदार म्हणून नायगाव मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधीही आणत आहेत.
त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात विकास होतांना दिसत असल्याने जनतेत त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे.शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत एक रूपयात पीक विमा भरून घेण्याचे जाहीर केले. सरकारने एक रूपयात विमा भरून घेत आहेत; पण अनेक ठिकाणी ऑनलाईन करण्यासाठी केंद्र चालक जास्तीचे पैसे घेऊन शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेऊन विमा भरून घेत होते.
याबाबतची दखल आ. पवार व पुनमताई पवार यांनी घेऊन त्यांनी आपल्या संस्थेमार्फत मोफत पीक विमा भरून देत आहेत. खरीप हंगामामध्ये शेतकरी शेतीच्या खर्चासाठी अडचणीत असतो. बी-बियाणे, खते आदींसाठी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भावना जपत हा मोफत पीक विमा उतरविण्याचा उपक्रम राज्यातील सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे.
दि. १ जुलैपासून नायगाव मतदारसंघात कै. संभाजी पवार शेतकरी उत्पादक कंपनीने मोफत विमा भरून देण्याचे केंद्र सुरू केले असून आतापर्यत मतदारसंघात ३४३६ शेतकऱ्यांचा मोफत पीक विमा भरून देण्यात आला असून अजूनही पीक विमा भरण्याचे काम आमच्या संस्थेमार्फत सुरू असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे

0 Comments