माधव पवार
राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका बऱ्याच दिवसा पासून रेगंळल्या असल्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे संकेत दिले पुढील दोन महिन्यात सदरच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने भावी जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य कोण कोण होणार असा प्रश्न चर्चेला जात आहे
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये रण मैदानी निवडणुका लढवण्यासाठी मागील गेल्या एक ते दोन वर्षा पासून अनेकांनी कंबर कसली होती परंतु अचानक सदरच्या निवडणुका रद्द झाल्यामुळे अनेकांची हिरमोड झाली होती परंतु निवडणूक आयोगाने सदरच्या निवडणुकीची चुणूक काढली असल्यामुळे धन दांडगे निवडणुकी मध्ये रणसंग्राम गाजण्यासाठी सज्ज होणार आहेत
निवडणूक आयोगाला लोकसभा व विधानसभा त्याच बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी मोठे तारांबळ उडणार होती परंतु अचानक निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात ढोल वाजवल्याने अनेक जण निवडणुकीत उभे टाकण्यासाठी काही दिवसात मोर्चे बांधणीसाठी सुरुवात करण्याची तयारीकरण्याची शक्यता वर्तवली जात आहे
निवडणूक आयोग हे अचानक कोणत्या वेळी कोणते ही निर्णय घेईल याचा अंदाज जनतेला लागत नसल्यामुळे सदरच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात सदरचे चाहुल दिल्यामुळे आता ग्रामीण भागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments