नायगाव तालुक्यात गेल्या सात ते आठ वर्षापासून तहसील कार्यालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या दोन उत्कृष्ट तलाठी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यात झाल्या असल्यामुळे दुसऱ्या तलाठ्यांची पर्याय व्यवस्था केल्या शिवाय त्यांना सोडण्यात येऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
सध्याच्या परिस्थिती मध्ये महाराष्ट्र शासनानी पिक विमा भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितले असल्याने त्यांची बदली होऊन गेल्याच्या नंतर कोणत्या कर्मचाऱ्याकडे सातबारा मागावा असा प्रश्न शेतकऱ्यानी केला आहे
तालुक्यातील रुई बु. सज्जाचे तलाठी आर के परोडवाड यांच्यासह मौजे आंतरगाव सज्जाचे तलाठी के जी लांडगे यांची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे
या दोन तलाठ्याच्या जागेवर नूतन तलाठी असल्या शिवाय सध्या तरी सोडू नये त्यांच्या जागेवर कोणता ही तलाठ्यांची नेमणूक केली नाही अथवा कोणताही कर्मचारी सज्जाला आला नसल्यामुळे ह्या सदरच्या तलाठ्यांना नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी सोडू नये अशी मागणी शेतकऱ्यासह जनतेतून केली जात आहे
रुई बु.तलाठी सज्जाचे उत्कृष्ट कामगिरी करणारे तलाठी तलाठी आर के परोडवाड हे कुंटूर येथे सहा वर्ष शेतकऱ्याची सेवा केली तर रुई बु येथे दोन चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचे अडचण भासू दिली नसल्यामुळे गेले आठ वर्षे दोन सज्जा मध्ये काम केले आहे
आंतरगाव सज्जाचे तलाठी के जी लांडगे यांनी सुद्धा गेल्या सात वर्षापासून तलाठी सज्जा चांगल्या प्रकारे सांभाळला असल्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख आणि सुख जाणून घेऊन त्यांनी प्रशासना कडून मिळणारे शासकीय अनुदान असो की पिक विमा असो मिळून देण्यासाठी मोठे प्रयत्न करीत होते

0 Comments