Header Ads Widget

सरकारने एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर लालूच दाखवली तर गेल्या वर्षाच्या पीक विम्याचे काय ? -

       माधव पवार
राज्यातल्या राज्य सरकारने यंदा एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मोठी सवलत दिली असली तरी येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा त्याच बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारने मोठी लालूच दाखविली असली तरी शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षाच्या विम्याचे काय असा प्रश्न शेतकरी गटातून केला जात आहे

गेल्या वर्षी विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची तुटपुंजी रक्कम टाकण्यात आली होती परंतु गेल्या वर्षांच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असताना सुद्धा या राज्यातील राज्यकर्ते शेतकऱ्याकडे हुंगून बघले नाही या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याच्या संदर्भात मोठ मोठाल्या घोषणा केल्या होत्या परंतु अध्याप पीक विमा देण्यात नाही असे शेतकऱ्यांतुन बोलल्या जात आहे 

सरकारची अद्याप तरी कोणती ही पूर्तता करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाने दिले असले तरी पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला होता ते पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार असा सवाल शेतकऱ्यानी केला आहे

राज्यातल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना या वर्षी एका रुपयात पीक विमा काढण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपये बचत झाले असले तरी गेल्या वर्षींचा पिक विमा कधी मिळणार ? व शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार असा ही असे शेतकऱ्यातून बोलल्या  जात आहे

खरे तर राज्यातले राज्य सरकार हे आगामी काळातील निवडणुकीच्या तोंडावर एका रुपयात पिक विमा भरण्याचे आवाहन केल्याच्या नंतर शेतकऱ्यानी यंदाच्या लागवडीचा पिक विमा एका रुपयात भरला असला तरी पिक विमा कंपनीने व सरकारने गेल्या वर्षांचा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकऱ्यातून जोर धरीत आहे 



Post a Comment

0 Comments