Header Ads Widget

प्रा. हनुमंत हांडे नेट मराठी परीक्षा उत्तीर्ण सर्व स्तरातून सन्मान व अभिनंदनाचा वर्षाव !!


      राजकुमार पाटील मंगनाळे

नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील अंजनी येथील रहिवासी असलेले व सद्य परिस्थितीत शरदचंद्र महाविद्यालय नायगाव येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले प्रा. हनुमंत बाबुराव हांडे यांनी नुकत्याच २०२३ च्या नेट मराठी परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल व यापूर्वी २०२० मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे

तालुक्यातील अंजनी येथील प्रा. हनुमंत बाबुराव हांडे यांच्या यशा बदल सामाजिक राजकीय मित्र मंडळ विविध क्षेत्रातून व समाजातील सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

प्रा. हनुमंत हांडे हे मराठी उच्च पदवीधर आहेतच सोबत त्यांना कला आणि संगीत याचीही आवड आहे आज पर्यंत त्यांनी बऱ्याच महापुरुषांचे व त्यांना शिकवलेले व त्यांचे आदर्श असलेले अशा व्यक्तींचे रेखाचित्र, व्यक्तीचित्र देखील रेखाटले आहेत.

सन २०२३ च्या चालू वर्षी त्यांनी नेट परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे ते एका सर्वसामान्य कुटुंबातून शैक्षणिक सर्व बाबी अवगत केले आहेत, त्यांचे लहानपणापासूनच आयुष्य हे मेहनत करूनच शिक्षण पूर्ण करण्यात गेलेल आहे.  

त्यांच्याशी संपर्क साधला असता ते असं म्हणतात की मी मूळचा अजनी येथील रहिवासी असलो तरी माझे संपूर्ण बालपण शेळगाव छत्री येथे गेले आहे याच गावात अनेकांनी सहकार्य, मदत व नम्रता शिकवली आहे

लहान पणा पासूनच्या वयातच वाचण्याची आवड निर्माण करून व सातत्याने काहीतरी बनायचे हे ऊरी ध्येय बाळगून मेहनत केली व त्याची आज नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन आत्मिक समाधान मिळते. प्राध्यापक हनुमंत हांडे यांचा समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व सन्मान होत आहे.

Post a Comment

0 Comments