नायगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची विल्हेवाट लागली असल्यामुळे या मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला असला तरी सदरच्या निधीचा वापर कोणत्या रस्त्यावर होतोय असा प्रश्न पडला आहे
सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदार संघातील अवैध रेती उपसा वाहतूक साठा थांबवा आणि आपल्या मतदार संघाचे रस्ते वाचवा असे पोस्ट केले जात आहे
या विभागातील जनता रस्त्याच्या बाबतीत कोणी बोलू नये म्हणून काही लोकांचे बोट आता तलाठी आणि सरपंचावरच येऊन ठेपले असून गेल्या अनेक महिन्यापासून कोठावधी रुपयाचा निधी आल्याचा वाजागाजा मोठ्या प्रमाणात झाला व त्यांचे उद्घाटन सुद्धा झाले परंतु अद्याप कसल्यास परिस्थिती मध्ये कोणताच रस्ता पावसाळ्या पूर्वी करण्यात आला नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे
या मतदारसंघात एक ही रस्ता चांगल्या क्वालिटीचा नसल्यामुळे रस्ता वाचवा म्हणण्याचा प्रश्नाच येत नाही जर या मतदार संघात गोदावरी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असेल तर यांची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी असताना सुद्धा गावच्या सरपंचाचा दोष काय ? असा ही प्रश्न चर्चेला जात आहे
सांबंधित गावचा तलाठी हा वरिष्ठ अधिकाऱ्याना सदरची बाब कळवितो परंतु अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात कारण ? तलाठ्याना निलंबित करा तर सरपंचांना बडतर्फ करा अशा पद्धतीचे पोस्ट सोशल मीडियावर वायरल होताना दिसून येत आहे
गोदावरी पात्रातुन अवैध रेतीचा उपसा करणारी टोळी ही अधिकाऱ्याच्या सहमती शिवाय उपसा करू शकत नाहीत यात तलाठ्याचा रोल काय ? अवैध उपसा स्टॉक रेती जर होत असेल महसूल प्रशासनातील अधिकारी का बरे गप्प बसावे असा प्रश्न चर्चेला जात आहे

0 Comments