Header Ads Widget

भाजपा युवा नेतृत्व श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वाढदिवसा निमित्त नरसीत १९ जुलै रोजी ख्यातकीर्त रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या किर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन !भाजपा महाजनसंपर्क उपक्रमा अंतर्गत "घर चलो अभियान" शुभारंभ पञकाचेही विमोचन लाडक्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी अवघी नरसी नगरी सजली !

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
भाजपा नांदेड जिल्हा ग्रामीण सरचिटणीस तथा माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वाढदिवसा निमित्त १९ जुलै रोजी नरसीत ख्यातकीर्त रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य किर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या यशस्वी ९ वर्ष सेवापुर्ती बद्दल सेवा, सुशासन व गरीब कल्याणचा आवाज बुलंद करत घर चलो अभियान शुभारंभ पञकाचे विमोचन देखील होणार आहे.
   
शतप्रतिशत भाजपा ही भुमिका घेत गेली अनेक वर्ष एकनिष्ठेने सबंध नायगांव विधानसभा मतदार संघात  भाजपाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेणारे व अफाट जनसमर्थन लाभणारे लोकाभिमुख युवा नेतृत्व म्हणून श्रावण भिलवंडे यांच्याकडे पाहिल्या जाते.जबरदस्त संघटन कौशल्य व कठोर संघर्षाची तयारी यातून असंख्य भाजपा कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या नांदेड जिल्ह्यातील प्रमुख लढवय्या भाजपा नेतृत्वात जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे यांचे नांव नेहमीच अग्रभागी राहीले आहे.
 
 सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना ताकद देत लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध कल्याणकारी उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाला सतत उभारी देणाऱ्या श्रावण भिलवंडे  यांचा वाढदिवस म्हणजे या भागातील कार्यकर्ता व जनतेसाठी जणू दिवाळी दसराच.याच हर्षोल्हासात यंदा भाजपाचे युवा नेतृत्व श्रावण भिलवंडे यांचा वाढदिवस प्रचंड उत्साहात साजरा करण्यात येणार आहे 

यानिमित्ताने १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा सुश्राव्य किर्तन सोहळा नरसी येथील शिवकृपा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
   
याच उत्सवात भाजापा महाजनसंपर्क मोहीमेच्या अनुषंगाने घर चलो अभियानाच्या लक्षवेधी पञकाचे विमोचन देखील भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.युवा नेतृत्व श्रावण भिलवंडे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा व घर चलो अभियान पञक विमोचन समारंभ यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरुन नरसीत जय्यत तयारी करण्यात येत आहे.
 
 भारतीय जनता पक्षात स्वकर्तत्वाने आपल्या कार्याची अविट छाप पाडणा-या भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने यापुढील सत्कार्यास शुभेच्छारुपी पाठबळ देण्यासाठी तमाम भाजपा पदाधिकारी! कार्यकर्ते व चाहत्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मा.श्रावण भिलवंडे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संयोजन समिती नरसीच्या वतिने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments