नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे देगांव येथे एका २५ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक १६ जुलै २०२३ रोजी उघडकीस आली आहे
सदरची घटना कळताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल.एन. बहातरे यांनी सदरच्या घटनेची पाहणी केली सदरील मयत विवाहित महिलेचे प्रेत ताब्यात घेऊन त्या शिवछेदन करण्यासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती सपोनि बहातरे यांनी दिली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हदीत असलेल्या मौजे देगाव येथील रहिवासी असलेली मयत महिला ही अंदाजे २५ वर्षाची असल्याचे सांगण्यात येते सदरची महिला आपल्या राहत्या घरी म्हणजे देगाव येथे रात्री अंदाजे २ वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या देगांव येथील मयत महिला कौशल्या आंनदा शिदे यांच्याशी तिचे लग्न झाले होते तिचा पती आनंदा दतात्रय शिंदे यांना दोन वर्षाची एक मुलगी व तीन वर्षाचा मुलगा असे दोन मुलं होते पतीने माहेरून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक त्रास देत होता आणि तू दिसायला सुंदर नाहीस अशी माहिती आहे
देगांव येथील मयत विवाहित महिलेचा पती आनंदा शिंदे यांना ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नागोराव बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसानी त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सपोनि बहातरे यांनी दिली असून दिलेल्या तक्रारी वरून पुढिल तपास सहायक पोलिस निरीक्षक बहातरे करीत आहेत

0 Comments