Header Ads Widget

हिम्मत असेल तर मिंदे गटाने आता सरकार मधून बाहेर पडून दाखवावे : शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांची फटकेबाजी

        माधव पवार 
नांदेड : राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाचाला कंटाळून आणि हिंदुत्व रक्षणासाठी आपण महाविकास आघाडी सोडून  भारतीय जनता पार्टी सोबत युती करत आहोत अशी बोंबाबोंब करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मिंदे गटाला आता उपमुख्यमंत्री अजित दादाच्या मांडीला पाणी लावून बसण्याची वेळ आली असल्यामुळे हिम्मत असेल मिंदे गटांनी सरकार मधून बाहेर पडावे असे अशी फटके बाजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना केली आहे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पन्नास खोके बाज समर्थकांनी याच कारणासाठी हिम्मत असेल  तर त्यांनी तातडीने सरकारमधून बाहेर पडावे असे खुले आव्हाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी दिले आहे.

ज्या मातोश्रीने आणि शिवसेनेने त्यांना मोठे केले होते त्या शिवसेनेशी आणि मातोश्रीशी गद्दारी करत चाळीस गद्दारणा सोबत घेऊन फडणवीस सोबत त्यांनी सरकार स्थापन केले . मात्र हे सरकार फार काळ टिकणार नाही हे याआधीच  उद्धव ठाकरे साहेबांनी ठणकावून सांगितले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या १६ आमदारांवर निलंबनाची टाकी तलवार आहे. ती टांगती तलवार आता लवकरच त्याच्या मानगुटावर कोसळेल आणि ते सर्वच आमदार अपात्र होतील

त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मिंद्याना घरी बसावे लागेल. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सार्थक आमदारावर अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर हे सरकार कोसळेल याची जाणीव झालेल्या भाजपाने पुन्हा एकदा दबाव तंत्राचा वापर करत, इडीचा दुरुपयोग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे

मात्र महाराष्ट्रातील जनता हुशार आहे त्यामुळे आगामी काळात भाजपाला या गद्दारीची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा देतानाच हिंदुत्वासाठी आणि अजित दादांच्या जाचाला कंटाळून महाविकास आघाडी फोडून भाजपासोबत सरकार स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या आमदारांना आता अजित दादांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली आहे

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांत जराही स्वाभिमान जिवंत असेल , त्यांच्यात खरे हिंदुत्व असेल तर त्यांनी तातडीने सरकारमधून पहेर पडावे असे ही ते म्हणाले आहे 

Post a Comment

0 Comments