हिमायतनगर महसूल प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या म्हणून दिनांक ३ जुलै २०२३ नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्यांची अधिकाऱ्यानी दखल घेऊन नुकत्याच बदल्या झाल्याच्या नंतर अखेर हिमायतनगरला मंडळधिकारी म्हणून बि एम चव्हाण यांनी पदभार स्विकारला आहे
या सज्जाला मंडळ अधिकारी राठोड यांची सेवानिवृत्ती झाल्याने हे पद रिक्त होते या ठिकाणी मंडळ अधिकारी पद प्रभारी कडे सोपविण्यात आले असले तरी एक जागा भरण्यात आली आहे
नुकतेच माहूर येथे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी या पदावर असलेले बी एम चव्हाण यांची हिमायतनगर वर्तुळामध्ये मंडळ अधिकारी म्हणून पळसपुर सज्जाला मिळाले असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे
तहसील कार्यालयातील रिक्त पदे नायब तहसीलदार मंजूर पदे ३ तर कार्यरत २ आणि रिक्त एक अव्वल कारकून मंजूर पदे ४ कार्यरत ४ रिक्त जागा नाही महसूल सहाय्यक मंजूर पदे ८ तर कार्यरत ७ रिक्त १ जागा मंडळधिकारी मंजूर पदे ३ तर कार्यरत २ आणि रिक्त जागा भरली तलाठी एकूण मंजूर पदे १८ तर कार्यरत १३ आणि ५ जागा रिक्त आहेत
शिपाई मंजूर ४ जागा कार्यरत ४ जागा रिक्त नाही कोतवाल एकूण मंजूर जागा १८ तर कार्यरत १३ आणि रिक्त ५ जागा शासकीय वाहन चालक जागा एक रिक्त पद नाही सदरच्या जागा बाकीच्या शासनाने तात्काळ भरून गैरसोय टाळावी असी मागणी जनतेतून जोर धरित आहे

0 Comments