नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड येथे दिनांक ७ जुलै २०२३ रोजी सकाळी विध्यार्थासाठी व पालकासाठी कैलासवासी गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मांजरम तथा प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी व पालकांसाठी रस्ता सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे
बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मांजरम येथील संस्थेचे अध्यक्ष श्रीपत संभाजीराव पाटील शिंदे मांजरमकर यांनी दिली आहे
तालुक्यातील मौजे मौजे सावरखेड व कोळगाव येथे दिनांक ७ जुलै २०२३ रोजी आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी संदीप निमसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे मार्गदर्शन विध्यार्थासह पालकांना लाभणार आहे
सरील कार्यक्रमासाठी बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड कुंटूर मार्केट कमिटीचे उपसभापती मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर सावरखेडचे माजी सरपंच बालाजी पाटील वानखेडे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष चेअरमन सरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व व गावातील सर्व पालक मंडळी आणि जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत
शाळेचे मुख्याध्यापक बी पी कानोले व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वर्ग उपस्थित राहणार असून अतिशय महत्वाच्या रस्ता सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे सदरच्या मोहिमेतून विध्यार्थासाठी व पालकां बरोबर जनतेला नक्कीच फायदा होणार असल्याची माहिती ही संस्थेचे अध्यक्ष श्रीपत पाटील शिंदे यांनी माहिती दिली आहे

0 Comments