Header Ads Widget

धर्माबाद तालुक्यात काही भागात ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस - मोठया पावसाची आवश्यकता शेतकऱ्याची थोडक्यात चिंता मिटली ?

       माधव पवार
नांदेड जिल्हाच्या धर्माबाद तालुक्यात काही भागात ढगाळ वातावरणामुळे पाऊसाला आडीच वाजता सुरुवात झाली परंतु काही खेड्यात पाऊसच पडत नसल्याचे सांगण्यात येत असून शहरात मात्र जोरदार पाऊस पडला शेतकऱ्यांना अधिक मोठया पावसाची अपेक्षा भासत आहे
जिल्हाच्या धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्याच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी काही भागात पावसामुळे पेरण्या करण्यात आल्या नसल्याचें सांगण्यात येत दिनांक ४ जुलै २०२३ रोजी धर्माबाद तालुक्यात पाऊस झाला असला तरी फार मोठा असा पाऊस पडला नसल्याचें व्रत आहे

धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना थोडं पावसामुळे दिलासा मिळाला तर बियाची उगवण होण्यासाठी थोडे सोपे झाले असले तरी धुव्वाधार पावसाची आवश्यकता आहे

तालुक्यात जवळ पास एका तासा पासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यातुन समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे वास्तव चित्र धर्माबाद तालुक्यात दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments