Header Ads Widget

पंतप्रधान नरेंद्र मोदीचा करीश्मा लवकरच संपणार आता निवडणूका जिंकण्यासाठी धर्माचा आदर घेतला जाणार प्रा रविंद्र पाटील चव्हाण !!

         माधव पवार 
केंद्रातील भाजपा सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे त्यामूळे पून्हा सत्तेत येण्यासाठी धार्मिक कलह माजवून धर्माचा आदर घेऊन दंगली घडवूनच सत्ता हस्तगत करण्याचा मनसूबा भाजप आखत असल्याचे निदर्शनास येते त्यामुळेच ञ्यंबकेश्वर कोल्हापूर सांगली अशा या धार्मिक ठिकाणी दंगल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छञपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले आहे 

एक देश एक संघ रहायचे असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊनच चालले पाहीजे निवडणुकीचे पूरतेच इतर पक्षाना विरोधक म्हणून पाहीले पाहीजे पण भाजप ने तर सत्ता नसलेल्या राज्यात ईडी सी बी आय ईडी शिबीआय इन्कम टॅक्स या विभागाचा ससेमिरा मागे लावून सरकारे पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे

याचे उदाहरणे अनेक राज्ये आहेत विरोधी पक्षनेता सत्ताधारी पक्षासोबत हात मिळविणी करत असेल तर हा लोकशाहीला कलंक आहे

सत्य हेच आहे की संपूर्ण देशातील सत्ता हिंदुच्याच हाती आहे तरीही भारत देशातील हिंदू धर्म धोक्यात आहे असे मानने म्हणजे आपल्या बूध्दीची किव येते

तरूणांच्या हाताला काम देण्याऐवजी भाजपच्या निवडणूक जाहीर नाम्यावर धर्माच्या नावावर माथी भडकविण्याचे काम नियोजन बध्द रित्या सूरू असल्याचा आरोप प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांनी केला आहे

येत्या वर्ष भरात लोकसभा विधानसभा निवडणुका असल्यामुळे धार्मिक व्देश जास्त पसरविले जाण्याची शक्यता आहे नव तरूणांना एवढेच सांगायचे आहे की जून्या रूढी पंरपरा पाळल्या जात आहेत उगाच त्याला धार्मिक रंग कोणी देत असेल तर त्याचे मनसूबे हाणून पाडा असे प्रा. रवींद्र पाटील
चव्हाण असे आवाहन केले आहे 

Post a Comment

0 Comments