Header Ads Widget

नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला व शेतकऱ्यांचे पीकाचे नुकसान आर्थिक मदत मिळवून देऊ - मा. शिवराज पाटील होटाळकर !!

 
         माधव पवार
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील अनेक खेड्यापाडयातील नागरिकांना जाण्यासाठी व येण्यासाठी असलेल्या रस्त्यावरचा संपर्क तुटला असल्यामुळे व मुसळधार पावसामूळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे

शेतकऱ्यांनो घाबरू नका सरकार आपल्या पाठीशी असल्यामुळे नुकसान भरपाई मिळवून देऊ असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यासह जनतेनी कसल्याच प्रकारे घाबरण्याची आवश्यक नाही प्रशासन २४ तास आपल्या सेवेत असल्यामुळे नागरिकांना गावांत राहात असला तरी मुसळधार पाऊस पडत असताना फक्त पूर परिस्थिती निर्माण होत असताना घरातच सुरक्षित राहावे या सदरच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठया प्रमाणात झाले आहे

सरकार आपल्या पाठीशी असल्यामुळे तात्काळ अनुदान मिळवून देण्यासाठी जिल्ह्यचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे हीं भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मा शिवराज पाटील यांनी सांगितले आहे

तालुक्यातील देगावचा पुरामूळे संपर्क तुटला असल्यामूळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी नागरिकांना अवघड झाले तर सावरखेड ते आंतरगाव जाणारा हीं मार्ग बंद झाला होता कृष्णूर ते बरबडा मार्ग सुद्धा बंद झाला असल्याचे व्रत असून दिनांक २६ व २७ जुलै २०२३ रोजी सततधार पावसामूळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आणि शेतकऱ्याचे तुफानी नुकसान झाले आहे

ग्रामीण भागातील सदरच्या अतिवृष्टीमूळे झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शिवराज पाटील होटाळकर यांनी केली आहे


Post a Comment

0 Comments